जि.प.प्राथमिक शाळा पिंपळदरावाडी, तालुका - अकोले, जिल्हा - अहमदनगर....आपले आमच्या वेबसाईटवर सहर्ष स्वागत...

जि प प्राथमिक शाळा पिंपळदरावाडीत शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

आरोग्य तपासणी :            


    शरीर सुदृढ असेल तर माणूस काहीही साध्य करू शकतो पण जर शरीरच निरोगी नसेल तर मानवाला अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या सवई तसेच शरीर निरोगी कसे ठेवावे याबाबद जाणीव झाली तर भविष्यात हेच विद्यार्थी निरोगी शरीराने आपल्या राष्ट्राच्या प्रगतीसाठी हातभार लावण्यासाठी सज्ज होतात. शाळेत विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी लावण्यासाठी आम्ही शिक्षक वृंद नेहमीच तत्पर असतो...   
                डॉ.धांडे(आरोग्य अधिकारी) दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी शाळेला भेट देतात त्यावेळी विद्यार्थ्यांची NRHM अंतर्गत शालेय आरोग्य तपसणी केली जाते. या तपासणीद्वारे दिव्यांग विदयार्थी, स्वच्छता व आरोग्यविषयी चांगल्या सवयी याविषयी मार्गदर्शन व उपचार केले जातात.

शाळेत डॉक्टर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा