अपंग मुलांचे शिक्षण :
महामानव बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, "शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे पिणार तो गुरगुरणार," म्हणजेच आपल्या जीवनात अमुलाग्र बदल धडवून आपले भविष्य उज्वलीत करणार... पण अपंग विद्यार्थ्यांचे काय ? खेड्यापाड्यात आजही अपंग विद्यार्थी म्हणजे कुटुंब परिणामी समाजावर ओझे समजले जाते, आजही खेड्यांत दिव्यांगाना सामान्य विद्यार्थ्यानाच्या बरोबरीने शिक्षण घेण्यासाठी आवश्यक त्या सुविधा नाहीत. तरीसुद्धा अपंग विद्याथ्यांना शिक्षण मिळावे आणि त्यांनीदेखील सक्षम व्हावे यासाठी आमच्या शाळेत येणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांसही तितकेच महत्व आहे जितके सामान्य विद्यार्थ्यास ! आमच्या शाळेतील सर्व शिक्षक वृंद दिव्यांग असलेल्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रतीचे शिक्षण देण्यासाठी सदैव पुढे आहेत...
![]() |
वरील छायाचित्रात अपंग सामावेधीत शिक्षण अंतर्गत – दिव्यांग विध्यार्थी किरण तळपाडे या विध्यार्थ्याला मार्गदर्शन करताना. अपंग मोबाईल टीचर – कराळे मॅडम व सदगीर सर.
![]() |
अपंग विध्यार्थी दिव्यांग शौचालयाचा वापर करताना. |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा